अहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल तर…”; उद्धव ठाकरेंना नितेश राणेंचे खडेबोल

मुंबई :- शिवसेना शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजान स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटांत अजान संपवतात, कशी प्रकारे म्हणतात, याकडे मौलाना लक्ष देतील. ते परीक्षक म्हणून काम पाहतील. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसं दिली जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना (Shivsena)करेल,’ असं सकपाळ यांनी सांगितलं. सकपाळ यांच्या या भूमिकेनंतर राजकारण चांगळेच तापले आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, हो पक्षप्रमुख, खरच मर्द असाल.. तर सांगून टाका की, तुमच्या विभाग प्रमुखला आपली शिवसेना आता “सेक्युलर”आहे. नाहीतर “हो मी नामर्द आहे” असं तरी सांगा, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर भारतीय जनता पक्षानं वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ठाकरे सरकारने सहा महिन्यांहून अधिक काळ राज्यातील प्रार्थनास्थळं बंद ठेवली होती. त्यावरूनही भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले . याचदरम्यान आता भाजपाने शिवसेनेला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER