यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा… याद रखना शिवसेना! नितेश राणेंचे पुन्हा मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र

Nitesh Rane-Uddhav thackeray

मुंबई :- तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. नितेश राणे ट्विटमध्ये म्हणाले की, ‘यालाच म्हणतात “lipstick” दौरा. मुख्यमंत्री… कुठल्याही गावाला भेट नाही. मोजून 10 km आतच. विमानतळावरचा आढावा. दौरा संपला!!! ईथे.. फडणवीसजीं चा 700kms चा झंझावात.. कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना!!’ अशा शब्दांत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत? नितेश राणेंचा सवाल 

याअगोदरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जातं, तसा हा प्रकार असल्याची टीका नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली होती.

याअगोदरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण (Konkan) दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवले जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका नितेश राणे यांनी केली होती.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button