शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात भाजपा आमदाराची पोलिसात तक्रार !

Shrikant Shinde - Ravindra Chavan

कल्याण :- पाणीप्रश्नावर डोंबिवलीतील भाजपाचे (BJP) आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विरोधात पोलीस उपायुक्तांकडे तक्रार दिली. तक्रारीत म्हटले आहे की, पाणीप्रश्नावर डोंबिवलीच्या भोपर गावात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी खासदार शिंदे जबाबदार राहतील. त्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे.

आधी घनकचरा व्यवस्थापनावरून वाद
कल्याण डोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर लागू केल्याचा भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी तीव्र विरोध केला. या प्रकरणी आमदार चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य करून आयुक्तांच्या विरोधातही टीकेची झोड उठवली. शहरात बॅनर लावून शिवसेनेचा थुकरटपणा, असे त्यावर लिहिले होते.

२७ गावांत अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. ही योजना भाजपा सरकारने मंजूर केली आहे. या योजनेच्या कामात खासदार शिंदे यांचा हस्तक्षेप असतो. तसेच भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहे. या सगळ्याला खासदार शिंदे जबाबदार आहेत. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले तर शिवसैनिकांसह खासदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला पाहिजे. यापुढे भोपर गावात पाण्याच्या मुद्यावर काही वाद झाल्यास त्याला खासदार जबाबदार असतील, असे चव्हाण यांनी निवेदनात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button