मुंबईत भाजपच्या आमदाराला सेनेकडून धक्का, कट्टर समर्थकांसह कार्यकर्ते सेनेत

मुंबई : मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीला काही महिनेच शिल्लक असताना शिवसेना (Shivsena) भाजपला धक्क्यावर धक्के देत दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत मनगटावर शिवबंधन बांधले होते. त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता. त्यापाठोपाठ सेनेने भाजपाला आणखी एक धक्का दिला आहे. भाजपा आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambakar) यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी नगरसेविका प्रेसिला कदम तसेच भाजपा प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी जोरदार झटका मानला जात आहे. एकीकडे भाजपाने मुंबईमहापालिका काबीज करण्याचा चंग बांधला आहे. तर दुसरीकडे मात्र भाजपात मोठया प्रमाणात गळती सुरु झाली आहे. या पक्षप्रवेशावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER