टीव्हीवर दाखवता म्हणून ‘सामना’ अस्तित्त्वात ; पवारांनंतर पडळकरांची शिवसेनेवर टीका

मुंबई :- भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अहिल्याबाई होळकरांच्या पुतळा अनावरणावरून नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी पंगा घेतला होता. त्यानंतर आता पडळकरांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे.

सामना वृत्तपत्रातील भाजपच्या टीकेबाबत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी मी सामना हे वृत्तपत्र मी कधी वाचलेही नाही, किंबहुना हा पेपर आमच्या जिल्ह्यात येतही नाही. तुम्ही टीव्हीवर दाखवता म्हणून सामना दैनिक अस्तित्त्वात आहे, हे लोकांना कळते. अन्यथा आमच्या जिल्ह्यात कोणी सामना वाचतही नाही, अशा शब्दांत पडळकरांनी सामनाच्या अग्रलेखावर टिप्पणी केली.

गोपीचंद पडळकर हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. ते सोमवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना ‘सामना’ वृत्तपत्रातून भाजपवर करण्यात येणाऱ्या टीकेविषयी विचारण्यात आले. तेव्हा गोपीचंद पडळकर यांनी ‘सामना’ची फार दखल घ्यायचे कारण नाही, असे सांगितले.

सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही लोकं टीव्हीवर सामना दाखवता मग तो लोकांना कळतो. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात सामना किती येतो?, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला. तसेच आमच्या जिल्ह्यात सामना येतच नाही, मी तर सामना कधीच वाचला नाही. त्यामुळे असल्या विषयात बोलणं बरोबर नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर शरद पवारांचा मोठा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER