सोनिया म्हणजे नवमातोश्री, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय : भाजपा

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana ranaut) मुंबईची (Mumbai) तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कंगनाला हरामखोर, असे म्हटले होते. मात्र आता नॉटी अन् बेईमान या शब्दाला मराठी भाषेत हरामखोर म्हटले जातं. कंगनाही नॉटी गर्ल आहे. तिची वक्तव्ये नेहमी अशाच प्रकारे असतात असं सांगत संजय राऊतांनी (Sanjay Raut) आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर (Atul-bhatkhalkar) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल (Naughty Girl) या धर्तीवर…ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय (Naughty Boy) आहेत असा टोला लगावला.

दरम्यान माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची वक्तव्ये नेहमीच ऐकतो. ती साधारणपणे, असे बोलतच असते. कंगना नॉटी गर्ल आहे. माझ्या भाषेत मला तिला बेईमान म्हणायचे होते आणि असे म्हणण्यासाठी आम्ही त्या शब्दाचा (हरामखोर) वापर करतो, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER