दाऊदच्या फोटोला काळे फासून चप्पला मारण्याचा कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता ; भाजपाची टीका

Atul Bhatkhalkar - Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मातोश्री निवासस्थ उडविण्याची धमकी काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदकडून मिळाल्याची माहिती समोर आली आहे . मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे फोन आल्याचा हवाला देत भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) जहरी टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले की, मातोश्री बॉम्बने उडवून द्यायची धमकी मिळाल्यावर कमीत कमी दाऊदच्या फोटोला काळे फासून त्याला चपला मारण्याचा एखादा ब्रम्हांड व्यापी कार्यक्रम लाचार सेनेकडून साजरा व्हायला हवा होता अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचा समाचार घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी कामं करायची ती आम्ही दिवसा-ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही हे विधान करुन अप्रत्यक्षपणे भाजपाला टोला लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER