मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थापा मारतात हे ठाऊक होतं, पण … ; भाजप नेत्याची टीका

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट (Corona Virus) पुन्हा वाढत चालले आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना विरोधकांसह सहकारी पक्षांचेही कान टोचले आहेत. लोकल, मंदिर सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपावर(BJP) निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विधानावर टीका करताना भाजपा आमदार अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) म्हणाले की, मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होतं, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्राने पाहिलं, आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल ते जे बोलले ते साफ खोटं आहे, आफ्रिकेतून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा अशा भाषेत त्यांनी टीका केली आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे अकार्यक्षम सरकारच्या अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचे भाषण होते, लसीकरणात महाराष्ट्राचा नंबर देशात सर्वात शेवटचा का? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, संचारबंदी आणि लॉकडाऊन असे इशारे देऊन काही फायदा होणार नाही, स्वतःच्या अपयशाबद्दल जनतेला दोष देऊ नका असा टोलाही अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER