संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात : भाजपची टीका

Atul Bhatkhalkar - Sanjay Raut - Uddhav Thackeray

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व मोदी (PM Narendra Modi) यांच्या कामाची शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेली तुलना भाजपला रुचलेली नाही. यावरून भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राऊतांना उत्तर दिले आहे.

‘कार्यकारी संपादक उद्धवजींची तुलना ब्रह्मदेवाशीही करू शकतात. बाकी सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊकच आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘मोदीजी फक्त चार तास झोप घेतात, तेवढा वेळ तरी काम करा,’ असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे . तसेच ‘मुख्यमंत्री घरी बसणारा नको, असा समोर येऊन लढणारा हवा,’ असं म्हणत भातखळकर यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाचा फोटोही ट्वीट केला आहे.

राज्यात कोरोनाचे (Corona) थैमान सुरु आहे . हे पाहता विरोधक सातत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेमतेम चार तास झोप घेतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेवढा वेळ तरी काम करावं ही आमची विनंती आहे,’ अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे विरोधकांना उत्तर देताना म्हणाले होते की ,सध्या पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवं. पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या कार्यालयात बसून काम करतात. ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्रीही त्यांच्या कार्यालयात बसून सर्व यंत्रणांवर लक्ष ठेवून आहेत. बाहेर पडून एका ठिकाणी जाण्यापेक्षा एका ठिकाणी राहून दहा ठिकाणची कामे मार्गी लागत असतील तर ते अधिक फायद्याचे आहे,’ असेही राऊत म्हणाले होते.

तर दुसऱ्या एका ट्वीटमधून भातखळकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य केलं आहे. ‘आदित्यजी, आपण उपनगराचे पालकमंत्री आहात, लोक आपल्याला शोधत आहेत. कधी तरी वेळ काढून इथल्या हॉस्पिटलची, आरोग्य व्यवस्थेची पाहणी करा. लोकांची परिस्थिती ठाकरे सरकारच्या काळात किती केविलवाणी झालीय ते लक्षात येईल,’ असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER