राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याची परंपरा ; कृषी विधेयकावरुन शरद पवारांवर बोचरी टीका

Sharad Pawar - Atul Bhatkhalkar

मुंबई : संसदेत कृषी विधेयकावरुन विरोधकांनी गोंधळ घातला होता . पंजाब, हरियाणा याठिकाणी या विधेयकाच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तर या संपूर्ण प्रकारावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही. शेतकरी विधेयक तात्काळ रद्द करावं अशी मागणी शरद पवारांनी केली होती. कृषी विधेयक आणि राजकारण यावरुन भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी पवारांवर निशाण साधला आहे .

भातखळकर म्हणाले की, आत्मचरित्रात कृषी उत्पन्न बाजार समितीची एकाधिकारशाही मोडून काढण्याचा जोरदार पुरस्कार करणारे शरद पवार आज राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याच्या परंपरेनुसार मोदी सरकारच्या एकाधिकारशाही मोडून शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या कृषीविधेयकांना विरोध करत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. या संदर्भात अतुल भातखळकर यांनी ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेतील उल्लेखाचा हवाला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER