कंगना बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय? भाजप नेत्याची टीका

Kangana Ranaut - BJP - Uddhav Thackeray

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. तिच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही कंगनावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. यावरून भाजप आमदारानं कंगनाचं एक व्हिडिओ ट्वीट रीट्वीट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे .

भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी कंगनाचं ताजं ट्वीट रीट्वीट करत शिवसेनेवर टीका केली आहे. ‘शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना या महिलेनं उघड आव्हान दिलंय. जिनं बॉलिवूडच्या (Bollywood) इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नव बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत,’ असा टोलाही भातखळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे .

दरम्यान ,अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला .यावरून कंगना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात वादंग पेटले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER