कधी तरी ‘संजय’ बनून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र दाखवा; भाजप नेत्याचा राऊतांना टोला

Maharashtra Today

मुंबई : देशातील कोरोना परिस्थितीवरुन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र सोडले . यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत(Sanjay raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. कधी तरी ‘संजय’(Sanjay) बनून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्र दाखवा, असे आव्हान दिले आहे.

भातखळकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, बोथट बोरूची अक्षरे…मुंबईतील दडवलेली रुग्णसंख्या, बीडमधील मृत्यूसंख्या, रुग्णालयांतील अग्निकल्लोळ, डॉक्टरांची कमतरता, महाराष्ट्रातील खासगी रुग्णालयांची नफेखोरी यावरही एकदा बोरू घासा. कधी तरी ‘संजय’ बनून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र दाखवा, असे ट्विट अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांनी केले आहे.

दरम्यान शिवसेनेने कालच्या अग्रलेखातून शेकडो मृतदेह गंगानदीच्या प्रवाहातून वाहत येत असल्याने तेथील प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं असून आज संजय राऊत यांनी सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून सध्याच्या एकूण परिस्थितीवर टीकास्त्र सोडले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button