हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार! शरजिल उस्मानी हा ठाकरे सरकारचा… भाजप नेत्याची टीका

Atul Bhatkhalkar & Uddhav Thackeray

मुंबई : एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी या वक्त्याने हिंदू समाजाबाबत केलेल्या विधानामुळे वादाला तोंड फुटले होते. शरजिल उस्मानीच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी लक्ष्य केले आहे .भातखळकर (Atul Bhatkhalkar) ट्विटमध्ये म्हणाले की, शरजिल उस्मानी हा ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले.

एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला.

दरम्यान, शरजिल उस्मानी हा पुण्यात येऊन गुपचूप जबाब नोंदवून निघून गेल्याचे समोर आल्यानंतर भाजपाने राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे. शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER