भाजपमध्ये एकनाथ खडसेंची अखेरची संधीही हुकली; मुंडे,तावडेंना राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे स्थान

Eknath Khadse & Vinod Tawde & Pankaja Munde

नवी दिल्ली :- गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. तसेच त्यांचे राज्यातील भाजप नेत्यांवर आरोप करणेही सुरूच आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. (BJP working committee) भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी नव्या टीमची घोषणा केली. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील नाराज नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, सतत पदासाठी, तिकिटासाठी पक्षावर नाराजी दाखवणारे एकनाथ खडसे यांचे या कार्यकारिणीत नाव नाही.

यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा समावेश आहे. राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत भाजपने खासदार हिना गावित यांना स्थान दिले आहे. (BJP) भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, महामंत्री ८, संघटन महामंत्री १ , सहसंघटन महामंत्री ३ असा समावेश आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांसोबत राहून संजय राऊतांनाही कोलांट्या मारण्याची सवय झाली ; भाजप नेत्यांचा टोला

जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपची कार्यकारिणी जाहीर होणार होती. मात्र, त्याच दरम्यान कोरोना संसर्गाचा फैलाव झाल्याने ही कार्यकारिणी लांबली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्य कार्यकारिणी घोषित केल्यानंतर त्यांनी तेव्हाच तावडे, मुंडे आताच्या कार्यकारिणीत नसले तरी राष्ट्रीय पातळीवर या नेत्यांचा विचार होणार असे म्हटले होते.  त्याप्रमाणे आता तावडे, मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या खडसेंना राष्ट्रीय कार्यकारिणीतही स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे खडसे यांची आता पक्षातच कोंडी झाली असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्रातून

पंकजा मुंडे ( महामंत्री)
विनोद तावडे ( महामंत्री)
विजया राहटकर ( महामंत्री)
सुनील देवधर ( महामंत्री)
व्ही. सतीश (सहसंघटन मंत्री)
जमाल सिद्धिकी (अल्पसंख्यक मोर्चा)
हिना गावित (प्रवक्त्या)
संजू वर्मा (प्रवक्ते)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER