शिवसेना ‘एनडीएतून’बाहेर; भाजपकडून घोषणा

bjp-minister-pralhad-joshi-says-shiv-sena-left-nda-alliance

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला आहे. तरी सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सर्वच प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेत अपयश आल्यानं अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्यातील सत्ता समीकरणामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते .

पुण्यात राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक; शरद पवार घेणार मोठा निर्णय?

अखेर आज दोन्ही पक्ष अधिकृतरीत्या वेगळे झाले आहेत .शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा भाजपकडूनच करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. प्रल्हाद जोशी यांनी, शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे, अशी माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्रिपदावरून युतीत वाद निर्माण झाला. मुख्यमंत्रिपद हवंच, असं सांगत शिवसेनेनं भाजपला दूर सारलं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यास हालचाली सुरू झाल्या आहेत .