‘मेरा आंगण, मेरा रणांगण नारा’ देत भाजपचे राज्य सरकारविरोधात आंदोलन

Devendra Fadnavis - BJP Protest

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बिघडलेल्या वैद्यकीय व्यवस्थेवर बोट ठेवत ठाकरे सरकारविरोधात भाजपाने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत महाराष्ट्र बचावचा नारा दिला आहे. भाजपचे नेते राज्यभरात आपआपल्या घराच्या अंगणात, कार्यालयाबाहेर काळ्या फिती बांधून, ठाकरे सरकारविरोधातील घोषणांचे फलक हातात घेऊन उभे राहिले.

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसंच हातावर पोट असणाऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे. या मागण्यांसाठी भाजपने ‘मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव’ अशा प्रकारची भूमिका घेऊन आंदोलनाची हाक दिली.

आभासी सरकार, केवळ सोशल मीडियावरच लढाई जिंकणार, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर घणाघात

या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असं आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते.

दरम्यान पक्षावर नाराज नेते एकनाथ खडसे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते . अखेर आज एकनाथ खडसे यांनी जळगावातील मुक्ताईनगरात आपल्या घरासमोर अंगणात उतरुन, महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला