पंढरपूर पोटनिवडणूक बिनविरोध करायची भाजपने ठरवले होते , पण … ; निंबाळकर यांचा आरोप

Maharashtra Today

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक भाजपला बिनविरोध करायची होती. त्याबद्दल प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनाही कळवलं होतं, मात्र राष्ट्रवादीने भारत भालके यांच्या पत्नीला संधी दिली असती, तर भाजपची बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी होती. परंतु राष्ट्रवादीला ही भावना कळली नसल्याचा आरोप भाजपचे माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeet Singh Naik Nimbalkar) यांनी केला आहे.
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची धुरा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात त्यांनी कंबर कसली आहे .

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडेना उभे केले आहे .

विरोधक पोटनिवडणुकीत मृत्यूचे भांडवल करुन अनुकंपाच्या नावाखाली जागा भरण्यासाठी मतं मागायला येतात, हे साफ चुकीचे आहे. आपल्याला लोकांना न्याय देता आला पाहिजे. लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडता आले पाहिजेत. अनुकंपाखाली जागा भरायला हे काय एसटी महामंडळ नाही” अशा कडक शब्दात निंबाळकरांनी विरोधकांना सुनावले. तसेच माढ्याची जागा सोलापूरच्या जनतेने ज्या पद्धतीने शरद पवारांकडून काढून घेतली, तशी पंढरपूरची जागाही पुन्हा एकदा त्यांना देण्याची चूक जनता करणार नाही, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहे. 2014 च्या आधी पंढरपूर कसे होते, त्यानंतर 2014 पासून भाजपाच्या काळामध्ये रस्त्यांसह विविध विकास कामे झाली आहेत. पांडुरंग हा गरिबांचा देव आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विठ्ठलभक्त असल्याचा दावा नाईक-निंबाळकर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button