मनसेकडून भाजपला खिंडार; समर्थकांसह नवी मुंबईतील बड्या नेत्याचा मनसेत प्रवेश

MNS - BJP - Maharashtra Today

नवी मुंबई : पुढच्या काही महिन्यांत नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक निवडून यावे यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरालाही वेग आला आहे. एकीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्रित लढण्याच्या तयारीत आहे तर दुसरीकडे भाजपनेही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

या निवडणुकीवर खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) लक्ष घालून आहेत. मात्र आज राज ठाकरेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे कळंबोली शहर उपाध्यक्ष नितीन काळे यांनी आपल्या समर्थकांसह मनसेचा झेंडा हाती धरला. राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण मनसेत जाण्याचा निर्णय घेतला अशी माहिती काळे यांनी दिली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजवर हा पक्षप्रवेशाचा छोटेखानी सोहळा पार पडला. राज ठाकरे यांनी नितीन काळे आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करत पक्षात प्रवेश दिला. तसेच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेकडून हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button