भाजपा खोटारडा, विखारी, कांगावेखोर, टूलकिट प्रकरणावरून सचिन सावंत यांची आगपाखड!

atul bhatkhalkar - Sachin sawant - Maharashtra Today

कोरोना व्हायरसला ‘मोदी व्हायरल’ किंवा ‘इंडियन व्हायरस’ म्हणण्याचे आवाहन करणारे एक टूलकिट सध्या सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावाने व्हायरल झाले आहे. या टूलकिटवरून भाजपाने काँग्रेसवर (Congress) झोंबणारी टीका केली. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी तर “प्रसंगी काँग्रेस देशद्रोहदेखील करू शकेल” या शब्दात काँग्रेसवर टीका केली. याला काँग्रेसने उत्तर दिले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणालेत – “भाजपा हा खोटारडा, विखारी आणि कांगावेखोर पक्ष आहे.” सावंत यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हे ट्विट केले आहे.

भातखळकरांचे ट्विट
भाजपा (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी या टूलकिट ट्विटरवरून शेअर करत काँग्रेसला सुनावले – “काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा कमी खतरनाक नाही. इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा, असे आदेश यातून काँग्रेसनं कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते. वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते.”

ही बातमी पण वाचा : काँग्रेसचे ‘टूलकिट’ खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक – अतुल भातखळकर यांची टीका

सचिन सावंत यांचे उत्तर
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी याला उत्तर दिले – “भाजपा हा अत्यंत खोटारडा, विखारी आणि कांगावेखोर पक्ष आहे. सदर टूलकिट बनावट आहे. काँग्रेसतर्फे जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यात अतुल भातखळकर यांचे नावही देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागाळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे.”

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अतुल भातखळकर यांनी ट्विट केलेल्या टूलकिटवर उजव्या कोपऱ्यात काँग्रेसचा लोगो आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा डागाळण्याची ही संधी आहे असे म्हटले आहे. कोरोना व्हायरसचा उल्लेख सोशल मीडियावर करताना कोरोनाचा भारतीय स्ट्रेन किंवा मोदी स्ट्रेन असा करण्याबाबतदेखील सुचवले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button