भाजप सर्वांना पुरून उरली म्हणूनच थयथयाट : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर :  ‘भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरली आहे. त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे.’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. यात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या पार्श्वभूमीवर भाजपनेही शिवसेनेवर पलटवार केला.

कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ‘ महाविकास आघाडीचे राज्यातील सरकार अपयशी व असंवेदनशील असून सरकारमधील तीनही पक्षांतील नेत्यांच्या विसंवादामुळे गोंधळलेले महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारचा भाजपला काही फरक पडत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच वेगवेगळी विधाने करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात; पण मुख्यमंत्र्यांना राऊतच जास्त प्रिय आहे. सर्वसामान्य हिंदू जाणतो की, या देशात हिंदूंचे रक्षण १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर झाले. संघाने ज्या प्रकारे हिंदू संघटित केला त्यातून हिंदू समाजाचे रक्षण झाले. त्यातून हिंदू एकत्रित झाले.

ताकद निर्माण झाली आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जातीय दंगे संपले. हिंदुत्व कोणाचे बेगडी आणि कोणाचे दलालांचे  आहे हे सर्वसामान्य हिंदूला जाऊन विचारा. पाटील म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंबद्दल आकस नाही. मात्र महाराष्ट्राचे प्रश्न कोणते? प्रश्नांचे अनेक प्रकार आहेत. उद्धवजींना या प्रश्नांचा अभ्यास नाही. शरद पवारांनी अचानक त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. उद्धवजींना मंत्रालय कुठे आहे, हेही माहीत नव्हते. कामकाज कसे होते हे माहीत नाही. देवेंद्र फडणवीस पाच  वेळा आमदार, त्याआधी नगरसेवक होते. त्यांना अनुभव होता.

मी पहिल्यांदा मंत्री झालो. मी रात्री ३/३ वाजेपर्यंत अभ्यास केला. नरेंद्र मोदीही अचानक मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनीही अभ्यास केला. उद्धव ठाकरे यांनीही आपला अभ्यास वाढवायला हवा. मी अनेकदा विरोधी पक्षाचा नेता म्हणून प्रश्न विचारले. त्याचे उत्तर त्यांनी मला अनेकदा दिली नाहीत. ‘आमच्या कुणाच्या चौकशा लावायच्या असतील तर ते खुशाल लावू शकतात. त्यांना घटनाच मान्य नाही असे दिसतेय. ईडी वाढीव संपत्ती आणि मनी लॉड्रिंगची चौकशी करते. आमच्या कुणाचे काही असेल तर तसे तुम्ही माध्यमात कागदपत्रे द्या. तुम्हाला तुमची माणसं टिकवता येत नाहीत, हे मान्य करावे’, असेही पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER