बेळगावात भाजप आघाडीवर ; शिवसेनेला धक्का

Maharashtra Today

मुंबई : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. निकालाचे कल आता हाती येत आहे. भाजपचे उमेदवार मंगला अंगडी सध्या आघाडीवर आहे . भाजपचे उमेदवार मंगला अंगडी (Mangala Angadi)यांनी मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी पिछाडीवर आहे.

मंगला अंगडी यांना 127623 मतं मिळाली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना 117288 मतं मिळाली आहे. मराठी एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके 32703 मतं मिळाली आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी (Mangala Angadi) यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांचे शुभम शेळके (Shubham Shelke) मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button