सत्तेत येण्यासाठी भाजपचे नेते माशासारखे तडफडतात : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal

मुंबई :- एकवीस वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर अनेक संकटे आली. मात्र, आम्ही मजबुतीने एकत्र राहिलो. गेल्या पाच वर्षातही अडचणीमुळे सत्तेत जात असल्याचे सांगून काही लोक राष्ट्रवादीला सोडून निघून गेले. या नंतरही आज राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आला आहे, असे वक्तव्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले.

ज्या पध्दतीने सरकार पाडण्यासाठी भाजप वेळ खर्च करत आहेत. सत्तेत येण्यासाठी माशासारखे तडफडत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लगावला. त्यांना घाबरून चालणार नाही. आम्ही लढणार. जो घाबरला तो संपला. तुम्ही राष्ट्रवादीत आले त्याचे दु:ख बाळगू नका. तुम्हाला ताकद पक्ष देणार आहे. ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले.

‘शरद पवारांनी अठरापगड जातींना घेऊन काम केले’

“आपल्या राजकीय जीवनात अठरापगड जातींना घेऊन काम केले आणि करत आहे. ही आपलेपणाची भावना राष्ट्रवादी काँग्रेस ठेवत असल्याने आज माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.” असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

आसिफ शेख यांच्या काही अडचणी होत्या. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या लोकांची राष्ट्रवादीशी नाळ जोडलेली आहे. आसिफ शेख यांनी राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला तो चांगला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव दिला आहे. आताच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष पॅकेज देण्यात आले, तसा असंघटित कामगारांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला, दरम्यान, डीपीडीसीमध्ये जास्तीचा निधी नाशिकला दिला जाईल, असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले. याशिवाय राष्ट्रवादी आजपासून तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : एखाद्याला बदनाम करण्याची फडणवीस यांची जुनीच पद्धत;  एकनाथ खडसे यांचे  भाजपवर टीकास्त्र 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER