भाजप नेत्यांनी नाईक कुटुंबाची भेट घ्यावी ; संजय राऊतांचा सल्ला

मुंबई : रिपब्लिक टीव्ही (Republic TV )वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami arrest) यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे भाजप नेत्यांनी राज्यभरात आंदोलनं पुकारले आहे. भाजपच्या या पवित्र्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) टीकास्त्र सोडले .

 भाजपच्या नेत्यांनी अन्वय नाईक (anvay naik) कुटुंबाची भेट घ्यायला हवी. त्यांची  वेदना समजून घ्यायला हवी, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे .आंदोलन करणं हा भाजपचा अधिकार आहे. तो त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम असू शकतो. पण त्यांनी नाईक कुटुंबाला भेटून त्यांच्या भावना समजून घ्याव्या असे ते म्हणाले. अर्णब गोस्वामी हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे चॅनल हे पक्षाचा लाऊडस्पीकर आहे.

त्यामुळे कार्यकर्त्यासाठी सर्व भाजप नेते उतरले. गोस्वामींवर केलेली कारवाई पत्रकार म्हणून नाही. रिया चक्रवर्ती बाबतीत भाजपची वेगळी भूमिका असते. आणि अन्वय नाईक यांच्याबाबत वेगळी असते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नोट नव्हती तरी प्रकरण पुढपर्यंत नेले. या प्रकरणात सुसाईड नोट असून त्यात नावेदेखील आहेत. महाराष्ट्राचे पोलीस हे बाहुल्या नाहीत असे राऊत यांनी म्हटले.

अन्वय नाईक यांच्या घरी जाऊन जर भाजपवाल्यांनी त्यांना काय वाटतं ते समजून घ्यायला हवं, असे राऊत म्हणाले. आंदोलन करण्याचा अधिकार त्यांना आहे. या देशात मानवता, सत्य, न्याय या शब्दाचा वापर कधी करू नये. अर्णब  यांच्यावरील हल्ला पत्रकार स्वत:वरचा हल्ला मानायला तयार नाहीत. कोणावरच अन्याय होणार नाही. आणि सत्याचा पराजय होणार नाही असे राऊत यावेळी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही बदल्याच्या भावनेतून कारवाई नाही : संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER