भाजपा नेत्यांना लाज वाटायला हवी ; शिवसेने नेत्याचा संताप अनावर

Maharashtra Today

मुंबई :- एकीकडे देशात कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .बेड, इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी (Oxygen) वणवण फिरावे लागत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्याही घटना घडल्या आहेत. आता, रुग्णालयात रेमडेसीवीर इंजेक्शन, मिळत नसल्याने नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रूग्णालयात (Bitco Hospital) भाजपा नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी तोडफोड केल्याची घटना घडली. त्यानंतर, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसांनी रुग्णालय बंद केले आहे. या घटनेनंतर तीव्र पडसात उमटत असून शिवसेनेने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. शिवसेना नेते आनंद दुबे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला .

दुबे यांनी एका पत्रकाराच्या ट्विटला उत्तर देताना, व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, भाजपा नेत्यांना सत्तेचा गर्व चढला असून अशा घटना करताना त्यांना लाज वाटली पाहिजे, असेही त्यांनी म्हटलंय. राजेंद्र ताजने यांनी केलेली तोडफोड आणि शिवीगाळ ही लाजीरवाणी घटना आहे. एकीकडे कोरोनाची लढाई संपूर्ण राज्य लढत आहे. आपले डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस मित्र कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. दुसरीकडे भाजपा नेत्यांचा हा अहंकार दुर्भाग्यपू्र्ण आहे. नाशिक महापालिकेत आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे, त्यामुळेच एवढा अहंकार भाजपा नेत्यांमध्ये आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही आवाहन करतो की, आपल्या नेत्यांना वेसन घाला, असेही आनंद दुबे यांनी म्हटले .

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button