भाजपा नेत्यांची नावं मोहन डेलकरांच्या सुसाइड नोटमध्ये; यावर फडणवीस म्हणतात…

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात (Pooja Chavan Case) संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला. अधिवेशनादरम्यान, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची कोंडी झाली. मुंबईतील दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर (Mohan Delkar) यांनी आत्महत्या केली. आत्महत्या ठिकाणी मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये भाजपा नेत्यांची नावे आहे, असा दावा करण्यात येत आहे. यावर चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा, असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे.

फडणवीस म्हणाले की, “आत्महत्या कोणाचाही असो, त्याची चौकशी झालीच पाहिजे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणावरून सुसाईड नोट सापडली आहे. सुसाइड नोट सापडल्यावर चौकशी होतेच. कोणीही आरोप करत असले, तरी या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपाच्या नेत्याचे नाव नाही, असे मी दाव्यानिशी सांगू शकतो. जर त्या सुसाइ़ड नोटमध्ये भाजपाच्या नेत्याचे नाव असते, तर एवढ्यात जाहीर केले असते.”

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरूनही फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला. म्हणाले की, “कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अवस्था केविलवाणी होती. अशी स्थिती त्यांच्यावर येऊ नये. सगळे पुरावे असताना मुख्यमंत्री खोटे बोलत आहे, हे मास्क लावल्यावरही त्यांच्या हावभावावरून खोटे बोलल्याचे स्पष्ट दिसत होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा चव्हाणप्रकरणात समोर आलेल्या क्लिप्स खऱ्या की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडले ते खरं की खोटं याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, असे आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोणाला साधूसंत ठरवायचे असेल तर ठरवा. मात्र तुमच्या नैतिकतेचे काय? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER