भाजप नेत्यांनीच पंकजा मुंडेचा गेम केला : विजय वडेट्टीवारांचा आरोप

मुंबई: भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे भाजपमध्ये वादळ निर्माण झाले आहे. 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांची जयंती असते. त्यावेळी गोपीनाथ गडावर पंकजा शक्तिप्रदर्शन करणार असून आपला पुढचा मार्ग निश्चित करणार आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागले आहे. यादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधताना म्हटले आहे की भाजपच्याच लोकांनी पंकजा मुंडे याचा गेम केला. ज्यांनी त्यांचा गेम केला त्यांच्यावर त्या नेम धरतील असा टोलाही वडेट्टीवारांनी लगावला आहे.

पंकजाच काय, राज्यातील अनेक बडे नेते सेनेच्या संपर्कात; संजय राऊतांचा दावा

पंकजांच्या संदर्भात भाजपमध्ये सर्वकाही सुरळीत असते तर पंकजा मुंडे कुठे जाणार नाहीत, असे सांगण्याची वे‍ळच भाजपच्या दोन नेत्यांवर आली नसती असेही ते म्हणाले. आपल्याला डावलून सत्ता चालवू शकत नाही हे पंकजा मुंडे दाखवून देतील असेही ते म्हणाले. वडेट्टीवार म्हणाले, पंकजा मुंडे यांच्याशी विधानसभा निवडणुकीत राजकारण झाले.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजप हा शब्द काढला आहे.

याआधी पंकजा मुंडे यांच्या प्रोफाईलचं यूजरनेम पंकजा मुंडे, भाजप असं होतं. पण आता ट्विटरवर पेजवर फक्त @Pankajamunde लिहलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची सध्या चर्चा आहे.