भाजप नेत्यांनी राज्याचा केलेला अवमान मतपेटीतून उमटला : मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर : कोरोना काळात सुशांतसिंग राजपूत आत्महत्या आणि कंगना राणावत प्रकरणात भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचा अवमान केला. केंद्राच्या मदतीने कुरघोड्या केल्या. हे जनतेला आवडले नाही, त्याचे चोख उत्तर या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानातून दिले आहे. भविष्यात महाविकास आघाडी सर्वच निवडणुकात कायम राहणार असून अजून एकदिलाने मैदानात उतरलेल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

ना. मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीच्या कारभाराला जनता कंटाळली असून पराभूत करण्यासाठी अतुर झाली आहे. अशी वारंवार द्वेषपुर्ण वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंंद्रकांत पाटील आणि नेत्यांनी केली. हा निकाल या वक्तव्य करणाऱ्यांना चपराक आहे. आमच्यातील एखाद-दुसरा आमदार फोडून पोटनिवडणूक झाली, तरी त्यांचे डिपॉझिट ही राहणार नाही. शिक्षक- पदवीधरमध्ये ही अवस्था तर सर्वसामान्यांमध्ये काय अवस्था होईल? याची त्यांनी कल्पनाच त्यांनी करावी. एव्हीएम मशीनवर लोकांचा अविश्वास आहे. त्यामुळे निकाल लागण्यास दोन दिवस उशीर लागला चालेल पण यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची वेळ आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER