ओबीसी नेत्यांना भाजपमधील नेते टार्गेट करताहेत; एकनाथ खडसेंचा आरोप

Eknath Khadse - Maharashtra Today

जळगाव : मागीलवर्षी ओबीसी नेत्यांना (OBC leaders) भाजपाने (BJP) नेहमीच सहकार्य केले. मात्र, गेल्या ४-५ वर्षांचा विचार केला, तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.

“गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला, माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले, बदनाम करण्याचे काम केले, चंद्रकांत बावनकुळे यांचा तिकीट नाकारण्यात आले, धनगर समाजाचे अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर असतील, अशी कितीतरी नाव आहेत. यांचा काहींना काही कारणाने छळ करण्यात आला, मात्र पार्टी म्हणून तो सहन करण्यात आला होता.” अशी संतप्त भावना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

पुढे खडसे म्हणाले की, “अलीकडे चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना धमकी दिली, की तुम्ही जामिनावर आहात. याचा अर्थ असा की माझ्या विरोधात असो की छगन भुजबळ यांच्या बाबत असो, ईडी लावण्याचा प्रकार म्हणजे सर्व षडयंत्र यांचेच आहे हे आता उघड व्हायला लागले आहे. कित्येक सरकार आले आणि सरकार गेले. मात्र विरोधकांना कारण नसताना ईडी लावावी आणि त्याचा छळ करावा, असे कधी घडले नाही. पूर्वी ईडी किंवा अन्य गोष्टी जनतेला माहीत नव्हते. आता माहीत होऊ लागल्या आहेत. मात्र, विरोधकांना दाबून ठेवण्यासाठी अशा यंत्रणांचा वापर होत असेल, तर ते योग्य नाही. “

सध्याची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत कोणीही राजकारण करू नये, अशाच प्रकारची काहीशी भूमिका आपण गेल्या महिन्यात मांडली. विरोधक असो वा सत्ताधारी यांनी एकत्र येऊन कोरोनाची लढाई लढावी, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली आहे. आपण त्यांच्या मताशी सहमत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी जळगाव ठिकाणी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button