शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर बरे वाटले असते : विनोद तावडे

Vinod Tawade & Sharad Pawar

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच पेटला आहे . तर दुसरीकडे कृषी विधायकांवरून  अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजप (BJP) नेते आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी टीकास्त्र सोडले .शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते तर अधिक बरे वाटले असते, असा टोला तावडेंनी लगावला.

“शरद पवार देशाचे कृषिमंत्री होते. त्यांना जर कृषी विधेयकांमध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते.  शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या; पण शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेत्याने केवळ विरोधासाठी विरोध करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही.” असा घणाघात विनोद तावडेंनी केला. कृषीविषयक विधेयक नीट पाहिले तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना मोदी सरकारने आणली असल्याचे तावडे म्हणाले .

या सरकारची नियत काय आहे, मराठा समाजाला कसे डावलायचे, हे या सरकारला माहीत  असल्याचेही तावडे म्हणाले. दरम्यान तावडे यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावरही भाष्य केले . खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत. यावर बोलताना, एकनाथ खडसे नाराज नाहीत, भाजप एकसंघ आहे, असे तावडे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER