उदयनराजे संतापले; पोलिसांनी ‘जशास तसे’ उत्तर द्यावे

Udayanraje Bhosale

सातारा :- हिंगणघाट येथील शिक्षिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेचे संतप्त पडसाद सध्या सर्वत्र उमटत आहेत. त्यातच, औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांमुळे भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आज बुधवारी ट्विट करीत उदयनराजे भोसले यांनी लोकांच्या भावनांकडे लक्ष वेधले.

महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आरोपीला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे, अशी लोकांची मानसिकता तयार होत असल्याचे उदयनराजे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना हिंगणघाट आणि औरंगाबाद येथे घडली असून, या राक्षसी प्रवृत्तीला संपविण्याची वेळ आता आली आहे, असे उदयनराजे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हिंगणघाटनंतर औरंगाबादही हादरले ! घरात घुसून महिलेला पेटवले