मी मराठा म्हणून बोलत नाही; जगात जात हा प्रकार नसता तर…- उदयनराजे भोसले कडाडले

Udyanraje Bhosle

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे . पण सर्व पक्ष आग्रही असताना मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळालं नाही. सध्या या आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला घेरताना दिसत आहे. यावर खासदार उद्यनराजे भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन भाष्य केले आहे.

मराठा समाजाचे आरक्षण ही कोणत्या एका पक्षाची नाहीतर सर्व पक्षांची जबाबदारी आहे. हा समाज न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. जगात जात हा प्रकार नसता तर निम्याच्यावर भांडणं झाली नसती, असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

लोकांनी एकमेकांशी बोलायचं बंद केलं आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करू नका. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अस्वस्थ समाजबांधवांनी अनेक मोर्च काढले आहे. लोकांची गरज ओळखून तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.

‘मराठा कुटुंबात जन्माला आलोय. मराठा म्हणून मी बोलत नाही. त्रयस्थ म्हणून, देशाचा नागरिक म्हणून माझ्या भावना कुटुंबाचा घटक म्हणून व्यक्त करतो. जसा प्रत्येकाला न्याय दिला गेला तसा मराठा समाजाला का नाही? मराठा समाजाच्या मागण्या रास्त आहेत. मुलांनी शिकून कुटुंबाला हातभार लावावा, अशी अपेक्षा आईवडील ठेवतात. त्यांनी काय करावं? जगात जात हा प्रकार नसता तर निम्म्याच्यावर भांडणं झाली नसती. लोक एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी राजकारण करु नका. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अस्वस्थ समाजबांधवांनी अनेक मोर्चे काढले आहेत. लोकांची गरज ओळखून तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही उदयनराजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER