भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यावर ताडपत्री चोरल्याचा आरोप, एफआयआर दाखल

Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका संपल्यानंतरही सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वाद अद्यापही सुरुच आहे. ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तो अधिकच वाढत चालला आहे. विधानसभा निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांनी वर्तमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जोरदार टक्कर देत पराभूत केले. त्यानंतर भाजपने सुवेंदू अधिकारी यांना विधीमंडळ नेता आणि विरोधी पक्षनेते बनवले. याच सुवेंदू अधिकारी( Suvendu Adhikari) यांच्याविरोधात पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली असून, मदत साहित्या चोरल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे.

यास या चक्रिवादळाने पश्चिम बंगालच्या काही भागांना जोरदार तडाखा दिला. यानंतर मदतकार्य अद्याप सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कोंटाई येथील पोलीस ठाण्यात पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मदत साहित्य चोरल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

कोंटाई नगरपालिकेत काम करणाऱ्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कारवाई करत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून घेतला आहे. यामध्ये २९ मे रोजी हिमांग्शू मन्ना आणि प्रताप डे नामक दोन व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेला आहे. यामागे सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी असून, केंद्रीय सुरक्षा दलांची यासाठी मदत घेण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सुवेंदू अधिकारी, सौमेंदू अधिकारी, हिमांग्शू मन्ना आणि प्रताप डे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रताप डे याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button