एकनाथ खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाहीत : सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar & Eknath Khadse

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्वपक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप नेते एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली तरी ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, असे मुनगंटीवार म्हणाले .

मी १९८० पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी अनेकदा बैठकीत, वैयक्तिक, प्रत्यक्ष संपर्क आला. त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मी समजून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा… काही घटनांबद्दल मनामध्ये दु:ख असू शकते; पण कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे की, खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाहीत, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली तरीही खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही, प्रतिबंध घालतो. त्यामुळे खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारच शिवू शकत नाही. हा विचार माझ्याही मनात शिवू शकत नाही आणि त्यांच्या मनात हा विचार येऊ शकत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात बैठक झाली . उत्तर महाराष्ट्रातील नेता पक्षात घेण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. उत्तर महाराष्ट्रातील मोठा नेता म्हणजे एकनाथ खडसे यांच्या नावाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER