महाविकास आघाडी सरकार पायात पाय घालून पडत असेल तर दोष आम्हाला देऊ नये; भाजप नेत्याचा टोला

Raosaheb Danave-MVA Govt

जालना :  महाविकास आघाडी सरकार ((MVA Govt) हे तीन पक्षांचे सरकार आहे . सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडत असेल तर दोष आम्हाला देऊ नये, असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी लगावला आहे . एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते . यावेळी त्यांनी राऊत-फडणवीस (Raut-Fadnavis) भेटीवरदेखील भाष्य केले. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात.

त्यातून राजकीय अर्थ काढू नये, असे दानवे म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत हे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही करत नसल्याचे दानवे म्हणाले. माझ्यात आणि संजय राऊतांमध्येदेखील मतभेद झाल्याचे दानवेंनी सांगितले. दिल्लीत मॉर्निंग वॉकला जात असताना भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी मला चहाचे निमंत्रण दिले होते . म्हणून त्यांची भेट घ्यायला गेलो होतो अशी माहितीही दानवे यांनी दिली.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra fadnavis)आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची काल (26 सप्टेंबर) दुपारी गुप्त भेट झाली. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाली. याअगोदर बरोबर आठवड्याभरापूर्वी (18 सप्टेंबर) भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्लीतल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. दानवे-राऊत भेटीनंतर आज फडणवीस-राऊत भेट झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.

ही बातमी पण वाचा : अखेर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया, संजय राऊतांना कोणतेही अधिकार नाही; सरकारमध्ये शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER