नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीकेसाठी करु नये: दानवेंचा राष्ट्रवादीला सल्ला

Eknath Khadse-Raosaheb Danave

मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसेंचा (Eknath Khadse) उपयोग हा राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीका करण्यासाठी करु नये, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. नाथाभाऊ जर तिथे गेले तर त्यांचा उपयोग अशा कामासाठी न करता, ते ज्येष्ठ आणि अभ्यासू कार्यकर्ते आहेत. त्यांचा उपयोग या राज्याच्या भल्यासाठी करावा. नाथाभाऊंचा उपयोग विरोधकांवर तोफ डागण्यासाठी करुन घेऊ नये. त्यांचा उपयोग भल्यासाठी करुन घ्यावा, असे रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) म्हणाले.

कोणाच्या रोखल्याने कोणी रोखलं जात नसतं. 2019 च्या निवडणुकीत भाजपने (BJP) राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे, असे वाटते भाजपलाही अशापद्धतीने काही मोठे नेते फोडून नुकसान पोहोचवता येत का, असा त्यांचा प्रयोग सुरु आहे. ते आता सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आमच्या नेत्यांवर, विरोधी पक्षनेत्यांवर किंवा पक्षातील अध्यक्षावर काही परिणाम होईल अस काही नाही, असेही दानवे म्हणाले.

आमच्या सरकारमध्ये पारदर्शक काम झाली आहेत. कुणी कितीही आरोप केला तरी त्याचा परिणाम आमच्यावर होत नाही. आम्हाला उत्तर महाराष्ट्राची चिंता नाही. पण नाथाभाऊ गेल्याचं दु:ख आहे, असेही दानवे म्हणाले .

 ही बातमी पण वाचा : आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चला !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER