शरद पवारांबाबत कंगनाकडे काही माहिती असेल म्हणून ती बोलली : रामदास आठवले

Kangana Ranaut - Ramdas Athawale - Sharad Pawar

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अभिनेत्री कंगना रणौतची पाठराखण केली आहे .

“कंगनाचे ऑफिस तोडायला नको होते . याआधी का तिच्यावर कारवाई केली नव्हती? राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवारांच्या (Sharad Pawar) काळात बांधकाम झालं याबाबद्दल मला माहीत नाही. तिला माहीत असेल म्हणून ती बोलली असेल. दाऊदची इमारतदेखील अवैध असल्याचे सांगितले. मग ती का तोडत नाहीत? तिच्या घराला हात लागता कामा नये. ” असे रामदास आठवले म्हणाले. महिला म्हणून कंगनाला संरक्षण देणं आमची नैतिक जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले. मुंबईने अनेकांना जगवले आहे. मुंबई काही कुण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही, असेही आठवले म्हणाले .

“मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी शब्दात उल्लेख ती चिडली असल्यामुळे केला; पण असा एकेरी उल्लेख करणं योग्य नाही. शिवसेना आणि अनेक पार्टीची कार्यायले अवैध आहेत. ती तुम्ही तोडणार आहात का? मुख्यमंत्रांबद्दल बोलताना आदरपूर्वक बोललं पाहिजे. अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं योग्य नाही. ५२ हजार कामं मुंबईत अवैध आहेत, ती तुम्ही तोडणार आहात का?” असा प्रश्नही रामदास आठवले यांनी उपस्थित केला.

दरम्यान कंगनाचा मुंबईतील खार परिसरातील डीबी ब्रीझ इमारतीमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटला २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. यासंदर्भात एका पत्रकाराने ट्विट केलं होतं. यावर उत्तर देताना कंगनाने शरद पवारांकडे बोट दाखवलं. ही इमारत शरद पवारांच्या भागीदाराने बांधल्याचा दावा कंगनाने केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER