राज्य सरकारने शेतकऱ्यांना फसविले : राम शिंदे

Ram Shinde-CM uddhav Thackeray

अहमदनगर :- राज्य सरकार विश्वासघातकी असून, या सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे, अशी टीका भाजपा नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

भाजपातर्फे शेतकरी कजर्माफी आणि वाढते महिला अत्याचार यावरून राज्यभरात आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत अहमनगर जिह्यामधील जामखेड येथे झालेल्या सभेत राम शिंदे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले.

.. म्हणून ‘वेल्हा’ तालुक्यास राजगड नाव द्या ; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे वचन देण्यात आले होते. परंतु, राज्य सरकारने आपला शब्द फिरविला. त्याचमुळे सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना सध्या ठाकरे सरकारतर्फे स्थगिती देण्यात येत आहे. हे सरकार केवळ ‘स्थगिती सरकार’ आहे, असा टोलाही यावेळी राम शिंदे यांनी लगावला.


Web Title :- State government cheated the farmers – Ram Shinde

(Maharashtra Today : Online Marathi News Portal)