कंगना झाशीची राणी, तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही; भाजपची राऊतांवर टीका

Sanjay Raut - Kangana Ranaut - Ram Kadam

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे . अशातच भाजप (BJP) नेते राम कदम (Ram Kadam) यांनी कंगनाची पाठराखण करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप नेते राम कदम यांनी कंगनाचं ट्विट रिट्विट केले आहे. ‘शिवसेना नेत्याचं पुन्हा एकदा निंदनीय विधान. महाविकास आघाडीनं मुंबई पोलिसांवर स्वतःच्या स्वार्थासाठी दबाव आणला आहे. जेणेकरून सुशांतला न्याय मिळू नये. त्यांचा उद्देशच बॉलिवूड ड्रग माफियांना संरक्षण देण्याचा आहे आणि कंगना झाशीची राणी आहे. जी या धमक्यांना घाबरत नाही,’ असे म्हणत राऊत यांच्यावर निशाणा साधला .

ही बातमी पण वाचा : उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ ;  रेणुका शहाणेंनी कंगना राणावतला झापले 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER