उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी, पण निष्ठावंत शिवसैनिकांचे काय? दरेकरांचा सवाल

Pravin darekar & Urmila Mantondkar

मुंबई : शिवसेनेने (Shivsena) विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांची उमेदवारी निश्चित केली आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी टीका केली आहे. विधान परिषदेची उमदेवारी कुणाला द्यावी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पण निष्ठावंत शिवसैनिकांचे काय?, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला.

जे शिवसैनिक पक्षासाठी रस्त्यावर उतरतात, त्यांचे काय? अशाप्रकारे इतरांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत शिवसैनिकांकडे दुर्लक्ष होत आहे , असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. वरळीसारख्या ठिकाणी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडली. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांचा विचार होयला हवा होता. मूळ शिवसैनिकांचं काय होणार हा प्रश्न समोर येतो, त्यांचा विचार होण्याची आवश्यकता आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER