राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे ; भाजप नेत्याची टीका

NCP AND BJP

पंढरपूर : पवार कुटुंब लेकराबाळासकट पंढपुरात आहे. त्यांचा साखर कारखान्यावर डोळा आहे. यांचे राजकारण केवळ श्रीमंतांसाठी आहे. मोदी सरकार गरिबांसाठी काम करत आहे, असं सांगतानाच राष्ट्रवादीचे (NCP) नेते बाजारबुणगे आहेत. त्यांनी समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम केलं आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी केली . या सरकारमध्ये ताळमेळ नसून पुढील भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे, असेही ते म्हणाले.

पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur-Mangalvedha Assembly by-election) भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांचा प्रचार करण्यासाठी प्रवीण दरेकर आणि गोपीचंद पडळकर आज पंढरपुरात आले होते. यावेळी या दोन्ही नेत्यांनी आवताडे यांचा प्रचार करताना ठाकरे सरकारवर हल्ला चढवलाच; परंतु राष्ट्रवादीवरही घणाघाती टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button