बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी हिंदुत्व शिकवू नये; भाजप नेत्याची टीका

Sanjay Raut-Prasad Lad

मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. भाजपचे (BJP) नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनीही बाळासाहेबांना वंदन केलं. त्यावेळी लाड यांनी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकास्त्र सोडले.

हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊन स्वत:ची तत्त्वं विकली आहे. बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला.

जनसंघाच्या सर्वच नेत्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे. आम्ही कुणाला विसरलो नाही. अटलजी, अडवाणीजी आमचे आदर्श आहेत आणि राहतील, असंही प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, लाड यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्या भेटीबाबत बोलताना लाड यांनी सांगितले की, राज यांच्याशी घरचे संबंध आहेत आणि ही सदिच्छा भेट होती. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत काही गौप्यस्फोट होणार आहे का? असा प्रश्न विचारला असता ‘आगे आगे देखो होता है क्या’ असे प्रसाद लाड म्हणाले.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांनी देशाला दिशा दिली, राज्याला दोन मुख्यमंत्री दिले – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER