पंकजा मुंडे यांची कोविड चाचणी निगेटिव्ह ; सर्वांचे मानले आभार

Pankaja Munde

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रकृती बिघडल्यामुळे कार्यकर्त्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. पण, आता खुद्द पंकजा मुंडे यांनी ‘आपली कोरोनाची ( Corona Test) चाचणी ही निगेटिव्ह आली आहे’, अशी माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी आपल्या सर्दी आणि ताप आला आहे, त्यामुळे आयसोलेट होत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आज कोविडची चाचणी केली असता रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. खुद्द पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून सांगितले की, ‘माझी कोविड-19 (Covid-19) ची टेस्ट निगेटिव्ह आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या काळजी व्यक्त केली त्यांचे आभार, असे मुंडे म्हणाल्या .

मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा कोरोनाची चाचणी करणार आहे आणि मगच सार्वजनिक कार्यक्रमांना जाईन’ अशी माहितीही पंकजांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER