खूप वाईट झालं, किती मोठं दुःख लेकराला रे … ; पंकजा मुंडे हळहळल्या

Pankaja Munde - Body Guard

मुंबई : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या शासकीय अंगरक्षकाच्या आईचे आज (10 जानेवारी) अपघाती निधन झाले. या अंगरक्षकाचं दुःख ऐकून पंकजा मुंडे हळहळल्या . “खूप वाईट झालं, किती मोठं दुःख लेकराला रे” अशा शब्दांत ट्विट करत त्यांनी आपला शोक व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांनी दुसरा अंगरक्षक मागवून घेतला होता. पोलीस दलातील गणेश खाडे यांची अंगरक्षक म्हणून वर्णी लागली. गणेश खाडे हे कांदेवाडी येथील रहिवासी आहेत. परळी तालुक्यातील कौडगाव साबळा हे त्यांचे आजोळ आहे. त्यांची आई सुलोचना खाडे काही दिवसासाठी माहेरी आल्या होत्या.

आज सकाळी गणेश खाडे हे आपल्या आईला मोटारसायकलवरून गावी नेण्यासाठी आले. गणेश आणि त्यांची आई घरी परतत असताना नाथरा पाटीजवळ गाडी स्लीप होऊन त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात आई सुलोचना यांचा जागीच मृत्यू झाला, तर गणेश खाडे जखमी झाले.

अपघाताची बातमी कळताच पंकजा मुंडे यांनी गणेश यांना फोन करून धीर देण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER