भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना करोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण (Pankaja Munde infected with coronavirus)झाली आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

माझा कोरोना (Corona) चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button