
मुंबई :- राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रचारानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांनी स्वत: विलगीकरणात गेल्या आहेत. त्यांनी रात्री उशिरा यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली.
पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांनी ट्वीट करत रात्री उशिरा यासंदर्भातील माहिती दिली आहे.
दरम्यान आज शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान (teacher and graduate constituency elections) होत आहे.
पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदी चे मत देऊन विजयी करावे .. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 30, 2020
ही बातमी पण वाचा : भाजपमध्ये जाण्यासाठी कोणत्याही नेत्याशी चर्चा केली नाही – जयंत पाटील
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला