मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते?- नितेश राणे

Nitesh Rane-uddhav

मुंबई :- एपीआय सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरणावरून आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व शिवसेना (Shivsena) नेत्यांवर टीकास्त्र सोडले . मुख्यमंत्री, शिवसेना नेत्यांना सचिन वाझेची वकिली का करावी लागते? असा थेट सवाल राणेंनी उपस्थित केला.

आता जो काही राज्यासमोर विषय गाजतो आहे, एक साधा एपीआय जेव्हा एवढं मोठं पाऊल उचलतो आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी किंबहुना त्याची वकिली करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उतरतात, शिवसेनेचे नेते उतरतात.

ही बातमी पण वाचा : ‘वाझे लादेन आहे का म्हणणारे मुख्यमंत्री कुठे आहेत?, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा’ – निलेश राणे

‘सामना’च्या संपादकापासून अन्य नेतेमंडळी सचिन वाझे किती चांगला आहे, सचिन वाझेची कशी चूक नाही, हे जेव्हा वकिली करण्यासाठी पुढं येतात, तेव्हा त्याच्या मागची काही कारणं आहेत. नेमकी त्याचीच वकिली यांना का करावी लागते? काय आहे असं या सचिन वाझेकडे, ज्यामुळे यांना हे सगळं पणास लावावं असं वाटतं? तर त्याचे काही विषय माझ्यासमोर आहेत. या विषयावर आपल्याला थेट कळेल की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक साधा एपीआय सचिन वाझेची वकिली नेमकी आज का करत आहेत? याबाबत काही विषय मला आपल्यासमोर मांडायचे आहेत.

मागील वर्षी आयपीएलची मालिका आपल्या इथं खेळली गेली, साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर आयपीएल मालिका खेळली गेली. आयपीएलच्या अगोदर, आयपीएलच्या नावाखाली जे काही विषय सुरू होते, ते या प्रकरणाशी कसे निगडित आहे, ही माहिती मी सर्वांसमोर मांडणार असल्याचे राणे म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER