“… ते स्वतःचं कुटुंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत”; नितेश राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका

Nitesh Rane - Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी  दिली. यावरून भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

” ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी योग्य नाव दिले आहे. कारण… ते स्वतःचं  कुटुंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत! लगे रहो !” असे म्हणत राणे यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील २ कोटी २५ लाख कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन ताप आणि प्राणवायू (ऑक्सिजन) तपासणार आहेत.

तसेच लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडविकार, लठ्ठपणा यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER