ठाकरे सरकार ‘मुंबई मॉडेल’ खोटं, इथल्या रुग्णांची नोंद पुण्यात; नितेश राणेंचा आरोप

CM-Uddhav-Thackeray-Nitesh-Rane

मुंबई : देशभरात कोरोनाने (Corona virus) थैमान घातले आहे . यापार्श्वभूमीवर देशभरात नावाजला जात असणारा ठाकरे सरकराचा मुंबई पॅटर्न हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. ठाकरे सरकार (Thackeray govt) मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या खात्यात करून येथील आकडा कमी भासवत असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की ,मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’ आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे नितेश यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button