या सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला; आता संघर्ष अटळ : नितेश राणे

Uddhav Thackeray-Nitesh Rane

मुंबई : नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण (Maratha Reservation) सध्या लागू होणार नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने (SC) आरक्षणाच्या अंमलबजावणीला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी मोठ्या खंठपीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. भाजपा (BJP)नेते आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून सरकारला इशारा दिला.

राणे ट्विटमध्ये म्हणाले की, “या सरकारने मराठ्यांचा विश्वासघात केला. आज आमच्या समाजाचे भविष्य अंधारात गेले आहे. कुठल्या तोंडाने या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्यायचे आणि कशासाठी? आता मूक मोर्चे नाहीच, आता संघर्ष अटळ आहे.” असे म्हणत नितेश राणे यांनी सरकारला इशारा दिला.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER