… आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागतात; नितेश राणेंचा टोला

Nitesh Rane - CM Uddhav Thackeray

मुंबई : आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव देण्यात आले असल्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकारला (Thackeray Government) टोला लगावला आहे. “उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत आहेत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात. दुर्दैव ते आमचे !” असे म्हणत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विटरवरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

दरम्यान आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. मात्र या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. ताजमहाल या वास्तूच्या पूर्वेकडे असलेल्या द्वाराजवळ हे संग्रहालय बांधण्यात येते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER